You are currently viewing वैकूंठ चतूर्दशी
Oplus_16908288

वैकूंठ चतूर्दशी

*जागतिक साकव्य विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*वैकूंठ चतूर्दशी*

 

शैव म्हणजे शिवभक्त आणि वैष्णव म्हणजे विष्णूभक्त.

दोन्ही पंथांची भक्ती कडवी असते.

खरं तर दोन्ही देव त्रिभूवन पालक… रक्षणकर्ते…. पालनहार अशी ब्रम्हांडाची निर्णायक अदभूत् शक्ती.

भक्त मात्र एकाचीच पूजा करतात. त्यालाच सर्वश्रेष्ठ मानतात.

संत नरहरी दासांची कथा हेच सांगते. डोळे मिटून श्रीविष्णूची कमरेची सांखळी बांधू बघतात. पण ती दैवी शक्ती हा भेद मानत नाही. कधी सांखळी सैल तर कधी घट्ट होत रहाते. थकून शेवटी नरहरीदास डोळे ऊघडून बघतात की, हे असं का होत आहे? माप तर बरोबर घेतले तेही डोळे मिटून. इथेच देव शक्ती दाखवतात. डोळे ऊघडल्यावर विठूरायाच्या जागी शिवशंकरच दिसतात. तेव्हा खात्री पटते, व दोन्ही देव एकच आहेत . शिव विष्णूचे अद्वैत आहे. मग ते थोर संत विठ्ठलभक्त झाले.

तसेच पूराणात आषाढी एकादशीला श्री. विष्णू सर्व ब्रम्हांडाचा भार श्री शंकरांवर टाकून शयन करायला विश्रांतीला चार महिने जातात. त्या शयनी एकादशी पासुन कार्तिकी एकादशीपर्यंत श्री. महादेव कार्य बघतात.

वैकूंठ चतूर्दशीला देव महादेव सहस्त्र कमलपूष्पे घेऊन हरीच्या भेटीला येतात. शिव व हरी ची भेट होते.

वैकूंठावर ही भेट चतूर्दशीला झाली म्हणून वैकूंठ चतूर्दशी. म्हणतात.

प्रेमाची ही भेट, ब्रम्हांडाचे कुशलमंगल सांगतात. एकच जल्लोष होतो. चैतन्य आनंद कर्तव्यपूर्तीचा संगम होतो. अद्वैत शक्तीचे हे म्हणून शिवाला तूळस व श्री विष्णूला बिल्वपत्र वहातात या दिवशी. हरीहर भेट अशी पूराणात ऐतिहासिक ठरते.

सुदर्शन चक्रची श्री. विष्णूदेवांना भेट मिळते.

दुस-या दिवशी त्रिपूरी पोर्णिमा. असंख्य म्हणजे लक्षदिप लाऊन साजरी करतात. दिव्यप्रकाशाचा ऊत्सवच साजरा होतो. पून्हा हे ब्रम्हांड चालवण्याची शक्ती म्हणजेच सुदर्शन‌चक्र देऊन श्री विष्णूंचा देव महादेव निरोप घेतात, आणि कैलासावर जातात.

 

अनुराधा जोशी.

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा