You are currently viewing विझ् इंटरनॅशनल आयोजित स्पेल बी, हॅंड रायटींग, ड्रॉइंग परीक्षांमध्ये मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची लक्षवेधी कामगिरी!

विझ् इंटरनॅशनल आयोजित स्पेल बी, हॅंड रायटींग, ड्रॉइंग परीक्षांमध्ये मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची लक्षवेधी कामगिरी!

विझ् इंटरनॅशनल आयोजित स्पेल बी, हॅंड रायटींग, ड्रॉइंग परीक्षांमध्ये मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची लक्षवेधी कामगिरी!

सावंतवाडी

विझ् इंटरनॅशनल आयोजित स्पेल बी, हॅंड रायटींग, ड्रॉइंग परीक्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी च्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादित केले. प्राथमिक व माध्यमिक विभागातून स्पेल बी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या 43 विद्यार्थ्यांपैकी 27 विद्यार्थी राज्य स्तरीय परीक्षेसाठी पात्र ठरले तर हॅंड रायटींग ऑलिम्पियाडमध्ये प्रविष्ट झालेल्या 21 विद्यार्थ्यांपैकी 18 विद्यार्थी राज्य स्तरीय परीक्षेसाठी पात्र ठरले तसेच ड्रॉइंग ऑलिम्पियाडमध्ये प्रविष्ट झालेल्या 31 विद्यार्थ्यांपैकी 21 विद्यार्थी राज्य स्तरीय परीक्षेसाठी पात्र ठरले. स्पेल बी मध्ये दक्ष परब,आदित्य देसाई, लिया खोबरेकर, आहाद बेग, दीप स्वार, अनन्या वालावलकर ,रिया जेवरे व विभव राऊळ यांनी सुवर्ण पदक पटकावले.तसेच हॅंड रायटींग ऑलिम्पियाडमध्ये दक्ष परब, माही तवटे, वर्धन बुवा व काव्या सावंत यांनी सुवर्णपदक पटकावले त्याचप्रमाणे ड्रॉइंग ओलिंपियाड मध्ये जिया परब, वेदा सावंत, आदित्य देसाई, हर्ष पाटकर व दीप स्वार यांनी सुवर्णपदक पटकावले.
त्याचप्रमाणे पुर्व प्राथमिक विभागातून हॅंड रायटींग परीक्षेत प्रविष्ट झालेल्या 14 विद्यार्थ्यांमधून शौर्य रांजणे, मैथिली घोणे, स्वरांश सावंत, मीत वेजरे, ध्रुव न्हावेलकर, सान्वी सुकी, प्रियल सावंत, वरद सावंत, देवांश शेडगे, ऊर्वी शिरोडकर हे 10 विद्यार्थी राज्यस्तरीय परीक्षेसाठी पात्र ठरले तसेच ड्रॉइंग परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेल्या 6 विद्यार्थ्यांमधून प्रियल सावंत, देवांश शेडगे, जाई आपटे, अथर्व परब व अयांश केरकर हे 5 विद्यार्थी राज्यस्तरीय परीक्षेसाठी पात्र ठरले. या सर्व परीक्षांसाठी श्रीम. अमिना नाईक यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा