*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित संत नामदेव महाराज जयंती निमित्त वंदन करणारी काव्यरचना*
*”श्री संत नामदेव महाराज”*
नामदेव करिती किर्तन नाचे पांडुरंग
भक्तांसाठी अलौकिक होत गोड सत्संगIIधृII
संत नामदेवांचा जन्म नरसी हिंगोलीत
माता गोणाई पिता दामाशेटी विठ्ठल भक्त
बालपण गेले पंढरपुरी विठ्ठल भक्तीतII1II
नामदेव कोमल हृदयी बालपणापासून
बालपणी पितृआज्ञेत विठ्ठलां अर्पिला नैवेद्य
देव खात नाही तोवर राहिले वाट पहातII2II
सव्वाशे पदे रचली शौरसेनी भाषेत
बासष्ठ शबद ग्रंथ साहेबांमध्ये समाविष्ट
नामदेवांनी रचिले पंचवीसशे अभंगII3II
भारत-भ्रमण करती नामाचा प्रसार
टाळ चिपळ्यांचा चाले अखंडच गजर
विठूचे गुणगान करती गाती अभंगII4II
घरची परिस्थिती सामान्य परी विनम्र अपार
कुटुंबातील सर्व करती नाम गजर
सर्व एका वेळी घेती समाधी होती नि:संगII5II
नामदेव सांगती जनाईची पदे अविट
शिष्या ठायी प्रेम आदर करिती प्रगट
जो गाईल पदे अंगणी नाचे पांडुरंगII6II
नाम तेची रुप रुप तेची नाम होय एकच
नाम केशव केवळ जाणे भाव भक्तच
नामदेव प्रार्थी देवा दिनांस दावा प्रेम रंगII7II
©️काव्य: श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
