You are currently viewing जय भगिनी परिचारीके

जय भगिनी परिचारीके

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी यांची परिचारिका दिनाच्या निमित्ताने लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*

 

*जय भगिनी परिचारीके*

*वृत्त—दासी(भृंगावर्तनी. समजाति ६,६,६,६)*

 

सिद्धा हो सेवेसी तू तत्पर परिचर्ये

नमो नमो तुज वंदन सेवाव्रत या कार्ये

जय भगिनी जय भगिनी जयजय परिचारीके

धवलवसन धारीणी तू रुग्णा तारीके।।धृ।।

 

वैद्यांच्या सुचनांचे करुनीया ते पालन

औषध वा गोळ्या वा कधीकधी इंजेक्शन

हाकेशी रूग्णांच्या जाशी तू नित धावुन

आप्तांना सामोरी पण जाशी सहजवदन

जय भगिनी जय भगिनी जयजय परिचारीके

धवलवसन धारीणी तू रुग्णा तारीके।।१।।

 

रात्रंदिन झटसी अन सेवा ही कर करशी

सतर्क स्थिर राहुनही रुग्णाला शांतविसी

कर्तव्यास कठोरता कधी मधी रागविसी

वात्सल्ये ममतेचे भांडारच तुजपाशी

जय भगिनी जय भगिनी जयजय परिचारीके

धवलवसन धारीणी तू रुग्णा तारीके।।२।।

 

आंग्लभाष संबोधन जे म्हणती तुज भगिनी

सार्थकता वैश्विकता बंधुत्वा वर्धीनी

अविरत रत अविश्रांत अथकपणे न थांबुनी

नवदिवशी नवरुग्णा सहाय्यव्रत होऊनी

जय भगिनी जय भगिनी जयजय परिचारीके

धवलवसन धारीणी तू रुग्णा तारीके।।३।।

 

भूलोकी अवतरून इश अंशी संचारी

रुग्णांच्या सेवेचे व्रत जाणुन स्वीकारी

देवासम रुग्णाला आधारहि देणारी

सुकामना शुभेच्छाच आज तुला सुअवसरी

जय भगिनी जय भगिनी जयजय परिचारीके

धवलवसन धारीणी तू रुग्णा तारीके।।४।।

 

 

—हेमंत श्रीपाद कुलकर्णी

मुलुंड, मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + sixteen =