कसाल पुलावर मोटारसायकल घसरून अपघात; दोघे जखमी
चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्यासह ग्रामस्थांनी तात्काळ मदत करत महामार्गावरील वाहतूक केली सुरळीत
कसाल :
कसाल पूल येथे कासारडे येथील निखिल राठोड व त्यांचा सहकारी यांच्या मोटारसायकलचा घसरून अपघात झाला. या अपघातात दोघेही जखमी झाले असून त्यांना तातडीने ओरोस येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच कळसुली विभागप्रमुख श्री. चंद्रहास उर्फ बबली राणे, रवी ठाकूर, सागर पारकर, आरटीओ कर्मचारी, महामार्ग वाहतूक पोलीस आणि ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करून जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यास सहकार्य केले.
तसेच अपघातामुळे विस्कळीत झालेली मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत करून महामार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला. त्यांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळाली.
