You are currently viewing गंभीर, क्षयरोग रुग्णांना केले वैद्यकीय साहित्य वाटप

गंभीर, क्षयरोग रुग्णांना केले वैद्यकीय साहित्य वाटप

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सामाजिक संस्थांचा उपक्रम

बांदा

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा, रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी, रोटरॅक्ट क्लब ऑफ पॉलिटेक्निक सावंतवाडी यांच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे गंभीर व क्षयरोग रुग्णांसाठी वैद्यकीय साहित्य देण्यात आले. यात क्षयरोग रुग्णांसाठी थुंकी जेल मध्ये बदलणारी पिशवी देण्यात आली.
यावेळी रोटरॅक्ट क्लब बांदाचे अध्यक्ष अक्षय मयेकर, रोटरी क्लब ऑफ बांदाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष मिहीर मठकर, रोटरॅक्ट क्लब ऑफ पॉलिटेक्निक सावंतवाडीचे अध्यक्ष धनराज पवार, रोटरी बांदाचे खजिनदार बाबा काणेकर, रोटरॅक्ट बांदा सचिव अवधूत चिंदरकर, सहसचिव मिताली सावंत, संकेत वेंगुर्लेकर, मुईन खान, कल्याणदास धुरी, शुभम केसरकर, विहंग गोठोसकर आदी उपस्थित होते.
वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील व डॉ. मयुरेश पटवर्धन यांच्याकडे वैद्यकीय साहित्य सुपूर्द करण्यात आले.
यावेळी रोटरॅक्ट सावंतवाडी अध्यक्ष मिहीर मठकर यांनी साहित्याबद्दल सविस्तर माहिती दिली. अक्षय मयेकर म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची वर्दळ ही मोठ्या संख्येने असल्याने वैद्यकीय साहित्याची गरज ओळखून रोटरॅक्ट क्लब व रोटरी क्लब बांदा यांच्या वतीने साहित्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. रोटरी क्लब सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत असून भविष्यात देखील विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा