You are currently viewing अस्तित्व

अस्तित्व

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सहाय्यक जनसंपर्क अधिकारी लेखिका कवयित्री वैशाली पडवळ “एंजल वैशू” लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*’अस्तित्व’*

 

निघाले होते मी

शोधायला स्वतःचे अस्तित्व

भेटले मग मला अनेक

रंगीबेरंगी मुखवटे

स्वार्थाने बरबटलेले

काही होतेच त्यात

निर्मळ अंतकरणाचे

धाव घेतली मी

तिथून मग वेगाने

पळत राहिले दमेस्तोवर

थकून बसले जमीनीवर

पाण्यात दिसले मला

माझेच सुंदर प्रतिबिंब

अन् मग अचानक…

संपला माझा शोध…

स्वतःला शोधण्याचा

झाला होता उलगडा

एका अनोख्या सत्याचा…

मी तर माझ्यातच आहे दडलेली

अल्लड, खट्याळ, गोड

लहान मुलांसारखी निरागस

फक्त अपेक्षा, कर्तव्य अन्

जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली,

स्वतःचे अस्तित्व हरवलेली

ठरवलं मग तेव्हाच,

उघडायची कवाड मनाची

जगायचं आता स्वतःसाठी…

फक्त आणि फक्त…

स्वत:च्या आनंदासाठी…

______________________________

 

©️®️

✍️… वैशाली पडवळ ‘एंजल वैशू’

अहिल्यानगर, महाराष्ट्र

सहाय्यक जनसंपर्क अधिकारी

जागतिक साकव्य विकास मंच

प्रतिक्रिया व्यक्त करा