You are currently viewing वैशाख वणवा…

वैशाख वणवा…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वैशाख वणवा…*

 

वैशाखाचा गरम वारा पक्षीप्राणी सैरावैरा

घालमेल जीवाची

काहील होई अंगाची हो तिक्ष्ण नजर का त्याची

पळसपांगारा गोलमोहराचा फुलतो सुंदर पर्णपिसारा

स्वस्थता न पण जीवाला हो अंगाला जाळी सारा..

 

ढग कोंदून तो स्वस्थच बसतो अवकाळीही बरसतो

सारी पिके पाडून आडवी पाणीच ओतून देतो

दु:खीकष्टी बळी बिचारा केविलवाणा होतो

आकाश फाटते जेथे सारे दोष कुणा ना देतो..

 

गारांचा तो करतो मारा पसरतो खडीच शेतावरती

आडोशाला शेळ्यामेंढ्या बैलही माना खुपसती

दिसतो नजारा एकीकडे तो फुलतो निळ्या आभाळी

बहाव्याचा धम्मक पिवळा बहरे झाडांवरती जाळी

 

निळा शेंदरी लाल गुलाबी पखरण गुलमोहोराच्या

खाली

गेंद जणू गुलबक्षी मोठ्ठा छत्र धरे वनमाली

रूपे दोन ती जगावेगळी सुंदरता जणू जाळी

चैत्र येतो फुलून सारा खेळतो वैशाख जणू ती होळी..

 

स्वस्थ बसावे ए सी मध्ये वाचत पुस्तक छान

दुरून बघावी सायंकाळी वैशाखाची शान

आमरसावर ताव मारूनी खावे आईस्क्रीम गोड

जरी पेटला वणवा त्याचा होऊ नये हिरमोड..

 

प्रा. सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा