You are currently viewing न्हावेलीतील वैद्यबुवा शशिकांत परब यांच्यासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्यबुवा शशिकांत परब यांच्यासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्यबुवा शशिकांत परब यांच्यासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

ओ निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटासाठी धावले आरोसचे रक्तदाते; गजानन दळवी यांच्या प्रयत्नांनाही यश

सावंतवाडी :

न्हावेली येथील सुप्रसिद्ध वैद्यबुवा शशिकांत परब उर्फ कांता वेंगुर्लेकर यांना बुधवारी १८ नोव्हेंबर रोजी जीएमसी बांबुळी रुग्णालयात ओ निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाच्या रक्ताची तातडीची गरज भासली. यावेळी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित रक्तदाते रसिक दळवी (रा. आरोस) यांनी तत्परतेने बांबुळी रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. हे त्यांचे अकरावे रक्तदान ठरले.

या रक्ताची उपलब्धता होण्यासाठी न्हावेली येथील दुर्मिळ रक्तगटाचे रक्तदाते गजानन दळवी यांनीही विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सहकार्यामुळे रक्ताची गरज पूर्ण होण्यास मदत झाली.
रसिक दळवी यांच्या या सेवाभावी कार्याचे ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या वतीने कौतुक करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनीही त्यांचे विशेष अभिनंदन केले.

या अमूल्य रक्तदानाबद्दल रसिक दळवी यांना संस्थेच्या वतीने मानाचा मुजरा करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा