You are currently viewing मळगाव येथील गणेश चॉकलेट फॅक्टरीचे राजन तेलींच्या हस्ते थाटात उद्घाटन

मळगाव येथील गणेश चॉकलेट फॅक्टरीचे राजन तेलींच्या हस्ते थाटात उद्घाटन

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या मळगाव येथील गणेश चॉकलेट फॅक्टरीचे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सावंतवाडीच्या गणेश फोटो स्टुडिओच्या कोरगांवकर बंधूनी मळगाव येथे चॉकलेट फॅक्टरी उभारली आहे. हा प्रकल्प नवोदित युवकांना प्रेरणादायी ठरो. तसेच या कंपनीच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होवो, अशा शुभेच्छा यावेळी तेली यांनी दिल्या.
मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव कुंभार्ली येथे ही चॉकलेट फॅक्टरी सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून चॉकलेटसह आईस्क्रीम, तंदूर चहा, केक आदी विविध वस्तू या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे महामार्गावर उभारण्यात आलेले हे दालन पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा