*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आनंद दिलाय आदित्यने*
आयुष्याच्या सायंकाळी
रोज बसायचो तरु तळी
*आनंद दिलाय आदित्याने*
गुडबाय म्हणून जातेवेळी
//1//
लावून वृक्ष बारावे वर्षी
साजरा केला “बालदिन”
मुहूर्त झाला पर्यावरणाचा
म्हणून आलेत अच्छे दिन
//2//
कानीकपाळी ओरडत तेव्हा
गुरुजी आणि आईवडील
बालबुद्धीला कसे कळावे
भविष्य आहे धुरकटलेल
//3//
ऐकून आकडे दिल्लीतील
*मन होतय कासावीस*
काय आहे भविष्यात येथे
मानव बनला स्वार्थीडॅम्बिस
//4//
चढतात मजल्यावर मजले
अक्कल रहाते गुडघ्यात
असून माहीत *महत्व*
*सुख शोधतात पैशात*
//5//
ठेवून साक्षी या वृक्षांना
प्रवास सुरू नव्वदिकडे
नव्या पिढीला काय सांगू
*नका तोडू कुणीही झाडे*
//6//
पिढी असूनही शिकलेली
बळी पडते *गावगुंडाना*
करून मोर्चात शब्द निषेध
मते देते त्यांचेच पोरांना
//7//
निवडून त्यांची पिलावळ
जंगले करतात तेच साफ
नसते त्यांना *देणे घेणे*
झाडांचा होतो सुपडासाफ
//8//
विनायक जोशी🖋️ ठाणे
1411/9324324157
