You are currently viewing चार दिवसांत खड्डे बुजवा, अन्यथा खड्डयांत दिवे लावून दिवाळी साजरी करणार

चार दिवसांत खड्डे बुजवा, अन्यथा खड्डयांत दिवे लावून दिवाळी साजरी करणार

चार दिवसांत खड्डे बुजवा, अन्यथा खड्डयांत दिवे लावून दिवाळी साजरी करणार

नगरसेवक देव्या सुर्याजी यांचा इशारा

सावंतवाडी :

प्रभागातील एमएनजीएल आणि नळपाणी योजनेच्या कामासाठी खोदलेले रस्ते येत्या चार दिवसांत पूर्ववत करण्यास सुरुवात करावी. अन्यथा, खड्डयांमध्ये दिवे पेटवून दिवाळी साजरी करत सत्ताधाऱ्यांचा व प्रशासन निषेध नोंदवला जाईल, असा इशारा नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.

प्रभागातील विकासकामानंतर रस्त्यांचे रिस्टोरेशन व्यवस्थित न झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या खड्डयांमुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या दुचाकींचे अपघात होऊन नागरिक जखमी होत असल्याची तक्रारी येत आहे. मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधूनही ठोस कार्यवाही होत नाही. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप श्री. सुर्याजी यांनी केला आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन चार दिवसांत रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करावे. अन्यथा, खड्डयांमध्ये दिवे लावत दिवाळी साजरी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला जाईल, असा इशारा श्री. सुर्याजी यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा