You are currently viewing मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांनी साजरी केली दिवाळी!
Oplus_16908288

मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांनी साजरी केली दिवाळी!

वर्सोवा कोळीवाड्याला भेट देत मच्छीमार कुटुंबीयांशी साधला संवाद

मुंबई : राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा फटका शेतकऱ्यांसह मच्छीमार बांधवांनाही बसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी वर्सोवा कोळीवाड्याला भेट देत मच्छीमार बांधवांसोबत दिवाळी साजरी केली.

यावेळी मंत्री नितेश राणे यांनी वर्सोवा कोळीवाड्यातील मच्छीमार कुटुंबीयांची भेट घेतली. शकुंतला तोंबरी आणि विजय तुका यांच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. मच्छीमार बांधवांच्या दैनंदिन अडचणी, व्यवसायातील समस्या तसेच सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांच्या कुटुंबांवर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी जाणून घेतल्या.

दिवाळीच्या निमित्ताने मच्छीमार कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत करत मंत्री नितेश राणे यांनी त्यांना दिवाळी फराळाचे वाटप केले. राज्य सरकार मच्छीमार बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

तसेच, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांचा मच्छीमार बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री नितेश राणे यांनी केले.

संकटाच्या काळात मच्छीमार बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आणि त्यांना आधार देण्याचा प्रयत्न या भेटीतून करण्यात आला. मच्छीमार बांधवांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा