*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”संत मोतीराम महाराज”*
संत मोतीराम महाराजांना साष्टांग दंडवत
समाजोद्धारासाठी वेचिले सर्वस्व जीवनIIधृII
पालम गाव महाराजांचे आहे जन्मस्थान
जन्म जाहला अठराशे सदूसष्टांत परभणीत
सरुबाई लाभली माता पिता दौलत राम होतII1II
समृद्ध कुळात जन्मले घरचे सर्व श्रीमंत
थोरले बंधू राहिले धार्मिक माणिकचंद
मोतीराम बालपणातच टाळी वाजवीत खेळतII2II
भजनाची आवड महाराजांना बालपणापासून
इतरांनी भजन करावे देती शिकवण
तुकोबांसम वारकरी संप्रदायात कीर्ती महानII3II
गोपूलालजींकडे केली नोकरी शिकले लेणं देणं
वसुली करायला लावली तापट शेटजीन
कर्जदाराला झाली मारहाण झाले दुःखी मनांतII4II
पांडुरंगाचा ध्यास घेऊन पोहोचले पंढरीत
निवृत्तीनाथ ठाकूरांकडून झाले अनुग्रहित
महाराज दंग झाले अखंड नामस्मरणांतII5II
गावोगावी चाले हरिनाम सप्ताह किर्तन भजन
हरिपाठ काकडा नित्य पूजेवर चाले गुजराण
सप्ताह करून प्रत्येक गावाला द्यायचे नेमII6II
महाराजांना फळा गावी आणले भक्तांनी गोळेगावहुन
त्यांना अंत काळ जवळ आल्याचे झाले अंतर्ज्ञान
जीवन समर्पण केले विठ्ठल टाळ गजरातII7II
©️काव्य:श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
