You are currently viewing हौस माझी पुरवा
Oplus_16908288

हौस माझी पुरवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रा सत्यवान शांताराम घाडी लिखित अप्रतिम लावणी*

 

वर्ण:-१३

   *हौस माझी पुरवा*

****************

 

 

सण दिवाळीचा आला पहा बरवा

अवं राया तुम्ही हौस माझी पुरवा।।धृ।।

 

घरी रंगरंगोटी देखणी करीन

मनासारखे दारी तोरण बांधीन

पैक्याचा गुंता तेवढा तुम्ही सोडवा

अवं राया तुम्ही हौस माझी पुरवा।।धृ।।१।।

 

मोरपंखी साडी मज आवडे भारी

साडी नेसून रांगोळी घालीन दारी

सोन्याच्या दागिन्यांनी मला हो मढवा

अवं राया तुम्ही हौस माझी पुरवा।।धृ।।२।।

 

दिवाळीचा सण साजरा करू जोडीनं

गोड धोड तुम्हास्नी हो मीच घालीन

साद प्रेमाची घाली मनिचा पारवा

अवं राया तुम्ही हौस माझी पुरवा।।धृ।।३।।

 

फोडू दिवाळी फटाके दोघं मिळून

दिवाळीची रात राया काढू जागून

झोंबू दे जरा मज थंडीचा गारवा

अवं राया तुम्ही हौस माझी पुरवा।।धृ।।४।।

 

*********************************

*रचनाकार:-* प्रा. सत्यवान शांताराम घाडी.

*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.

*ठाणे:-* दिवा

 

🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸

प्रतिक्रिया व्यक्त करा