*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दिस हुन्नरीचे पण ..*
दिवाळीच्या तारका ह्या पहा पृथ्वीवर आल्या
बनून पणत्या पणत्या अंगणात या सजल्या..
दिसे साजरे अंगण मनामनात फुलल्या
वाऱ्यासवे वाती साऱ्या झगमगत्या नाचल्या..
रांगोळीची सजावट वर रंगले आकाश
पेठा पेठा सजल्या हो किती प्रकाश प्रकाश..
दिस हुन्नरीचे खास पण दुष्काळ पडला
पाणीपाऊस नि देव शेतकरी नागवला..
दैन्य संपतच नाही नाही कदर कुणाला
पेठा सजती शहरी जीव लागला पणाला..
तेलवातीला पारखा लाखांचा तो पोशिंदा हो
नाही पिकवले धान काय खाणार सांगा हो..
येतील प्राण गळ्याशीच रोज पडतील फाका
मग उपयोग काय देवा मारून हो हाका..
शेतकऱ्याला वाचवा हीच औंदाची दिवाळी
त्याच्यावरून हटू द्या दुष्टाव्याची छाया काळी..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
