You are currently viewing दीपावली (दिपोत्सव)…!!!

दीपावली (दिपोत्सव)…!!!

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साकव्य विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम लेख*

 

*दीपावली (दिपोत्सव)*…!!!

. *Festival of light*

.

. *शुभदीपावली*

. _____________

 

. *सहत्रदीपा : शुभंभवतु: जीवनं सुखेन, संतोषेण, शांत्या आरोग्येण च प्रकाशयन्तु!!*

 

मित्रहो,

*दिवाळीचे लक्षदीप तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी समाधान, मन:शांती आणि निरामय आरोग्य सदैव उजळत राहो या शुभेच्छा..!!*

भारतीय हिंदू संस्कृतीमधील दीपावली ( दिपोत्सव ) म्हणजे सर्वात मोठ्ठा असा आनंदाचा सण मानला जातो. या दीपोत्सवाला *सणांचा राजा* असे संबोधले जाते.

प्राचिन काळापासून भारतीय परंपरेप्रमाणे वर्षातील *अश्विन आणि कार्तिक ( ऑक्टोबर / नोव्हेंबर ) काळात साजरा केला जातो.*

विशेष म्हणजे आता साऱ्या जगात हा सण अत्यन्त उत्साहाने साजरा केला जातो.

या दीपावलीच्या आनंदोत्सवात पुराणकाळातील त्रेतायुग तसेच द्वापारयुग कालपर्वातील ” *रामायणाचा काळ किंवा महाभारताचा काळातील अनेक ऐतिहासिक / पौराणिक कथांचा दृष्टांत आढळतो.*

श्री. प्रभुरामचंद्र जेंव्हा दशानन लंकाधीपती रावणाचा वध करून अयोध्येला परतले तो आनंदाचा क्षण म्हणून *दीपावली हा उत्सव साजरा केला जातो असे म्हटले जाते.*

तर भगवान श्रीकृष्णाने प्रजेला वेठीस धरून छळणाऱ्या क्रूर नरकासूर राक्षसाचा वध केला तो दिवस *नरकचतुर्दशी* म्हणून दिवाळीत साजरा करण्याची प्रथा आहे. तर विविध पौराणीक कथांच्या आधारे समुद्रमंथनाच्या वेळी कार्तिक अमावास्येला धनधान्य आणि सुखऐश्वर्य, समृद्धीची साक्षात देवता मातालक्ष्मी प्रकट झाली म्हणून तो दिवस सर्वत्र *लक्ष्मीपूजन* म्हणून संबोधला जातो.

 

या दिवाळी उत्सवात सलग पाचसहा दिवस म्हणजे *वसुबारस, धनत्रयोदशी, नर्कचतुर्दशी, लक्ष्मीपूजन , बालिप्रतिपदा ( हा साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा. मुहूर्त ) बळीराजाच्या स्मरणार्थ म्हणून साजरा केला. तर भाऊबीज ( यमद्वितीया ) म्हणजे बंधूभगिनीच्या पवित्र प्रेमाचे अद्वितीय प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो.*

या दिवशी आपल्या भावाला दिव्याने ओवाळण्याची ( औक्षण ) करण्याची मांगल्यपूर्ण प्रथा आहे. यामागे यमदेव आपल्या यमुना या बहिणीच्या घरी आवर्जून जेवणासाठी येत असतो ही भावना असते.

या दीपावली सणाच्या आनंदोत्सवाचे प्रत्येक दिवसाचे विशेष सांस्कृतिक औचीत्य आहे. त्यामध्ये अत्यन्त अध्यात्मिक , पावित्र्यपूर्ण , सुसंस्कृत, कौटुंबिक सौहार्दपूर्ण, ऋणानुबंध कसे आनंदाने, समाधानाने एकत्र येवून आनंद घेत असतात याचे दर्शन होते. आणि त्यातून सामाजिक आणि सांस्कृतिक मनोमिलनाचे, आत्मीयतेचे महत्व प्रत्ययास येते.

 

स्वातंत्रपूर्व तसेच स्वातंत्र्यानंतर साधेपणा, सामाजिक एकोपा, सडारांगोळी, दिवाळी फराळ, दिव्यांची आरास, कौटुंबिक जिव्हाळा , शेजारधर्म, गाठीभेटी, म्हणजे विशेष करून मानवी निर्मळ नाते संबंधाला प्राधान्य होते. त्यावेळी सामुहीक आनंद होता पण अशा गोष्टी म्हणजे सुमारे 1900 व्या शतकातील दिवाळी आणि आजच्या 2000 शतकातील या दिवाळी उत्सवात कालमानाप्रमाणे खुप बदल जरी झाले असले तरी उत्सव आजही आनंदाने साजरा केला जातो.

आजकाल या बदलत्या काळात वैज्ञानिक दृष्टीकोनातून प्रदूषणमुक्त, पर्यावरण पूरक सर्वोतोपरी हितावह आणि प्रसन्न सुखकर दिवाळी कशी होईल याचा विचार करणे मात्र आता अत्यन्त गरजेचे आहे.

दिवाळी हा सण आता आपण सर्वांनी

अंतर्मुख होवून नवयुगाचे आव्हान स्वीकारून प्राचिन परंपरांचे योग्य ते संस्कार आबाधित ठेवून आपले नैराष्य, आपले अज्ञान, अंधश्रद्धा दूर करून विवेकाने आणि श्रद्धेने ” *तमसो ज्योतिर्गमय* * म्हणजेच अंधाराकडून दिव्यप्रकाशकडे प्रस्थान करण्याचा संकल्प केला पाहिजे ….!!!

 

*!! सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तीमुक्तिप्रदायिनी !!*

 

*!! मंत्रमुर्तये सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते!!*

🔯🕉️🔯

 

*इती लेखन सीमा……*

 

*वि.ग. सातपुते.*

अध्यक्ष :-

*महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे. ( महाराष्ट्र )*

📞*9766544908*

*बेंगलोर (कर्नाटक )*

प्रतिक्रिया व्यक्त करा