You are currently viewing राजीवलोचन श्रीराम

राजीवलोचन श्रीराम

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित श्रीरामाची भूपाळी*

*राजीवलोचन श्रीराम*

उठी श्रीरामा पहाट झाली
पूर्वदिशेला चढली लाली!!धृ!!

पक्षी निघाले मुक्त नभांगण
फुले वेलीवर झुलती उमलून
उघडी आता राजीव लोचन
उषा अवतरली…..!!१

घेऊनी कळशी शरयूतीरावर
निघती ललना आता सत्वर
राऊळात बघ चालला गजर
किरणप्रभा फाकली….!!.२

लुप्त तारका आणि चंद्रमा
पुरे जाहली नीज श्रीरामा
तुझ्या दर्शना स्वर्ण अरुणिमा
द्वारी खोळंबली….!!३

०००००००००००००००००
अरुणा दुद्दलवार✍️🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा