You are currently viewing कातकरी समाजाची दिवाळी गोड करण्यासाठी ५०० साड्यांचे संकलन!

कातकरी समाजाची दिवाळी गोड करण्यासाठी ५०० साड्यांचे संकलन!

कातकरी समाजाची दिवाळी गोड करण्यासाठी ५०० साड्यांचे संकलन!

मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचा उपक्रम; मावळातील ६५ कुटुंबांना साड्या व दिवाळी फराळाचे वाटप

मावळ :

आदिवासी व कातकरी समाजातील कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने विशेष मदत उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मावळ तालुक्यातील ६५ कातकरी कुटुंबांना दिवाळीनिमित्त जीवनावश्यक व सणोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी गेल्या २० दिवसांपासून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना वस्तू दान करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आतापर्यंत ५०० साड्यांचे संकलन करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाला दोन साड्या तसेच १५ वेगवेगळ्या प्रकारच्या फराळाच्या पदार्थांचे पॅकिंग करून भेट देण्यात येणार आहे.
सध्या संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संकलित वस्तूंची प्रतवारी, वर्गीकरण आणि पॅकिंग करण्याचे काम करत आहेत. समाजातील वंचित घटकांनाही सणाचा आनंद घेता यावा, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, महिला अध्यक्षा मीनाताई करंजवणे, पश्चिम महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, सतीश हंचाटे, जयश्री हरपळे, ॲड. पंचरत्ना बावस्कर, मीनाक्षी बावस्कर यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा