You are currently viewing ११ नोव्हेंबरला बांद्यात भव्य आंतरराज्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन

११ नोव्हेंबरला बांद्यात भव्य आंतरराज्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी :

 

११ नोव्हेंबरला बांद्यातील आमची वाडी-देऊळवाडी तर्फे नरक चतुर्दशी निमित्त भव्य आंतरराज्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ ते १० या वेळेत बांदा येथील बांदेश्वर मंदिर येथे हि स्पर्धा संपन्न होणार आहे. नरकासुर स्पर्धे दरम्यान अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील प्रथम पारितोषिक १० हजार, द्वितीय पारितोषिक ५ हजार, तृतीय पारितोषिक २ हजार, चतुर्थ व पाचवे पारितोषिक प्रत्येकी १ हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा विनामूल्य असून अधिक माहितीसाठी अक्षय मयेकर ९५०३८७१९२४ किंवा संकेत वेंगुर्लेकर ९०१११०७५६२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन स्पर्धेचे संयोजक सागर सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा