You are currently viewing वैश्य समाज पतसंस्थेला 1 कोटी 91 लाखांचा नफा…

वैश्य समाज पतसंस्थेला 1 कोटी 91 लाखांचा नफा…

वैश्य समाज पतसंस्थेला 1 कोटी 91 लाखांचा नफा…

गणपत वळंजू, ईश्‍वरदास पावसकर यांची माहिती..

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रेसर आलेली सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट या संस्थेस सन 2023-24
या आर्थिक वर्षामध्ये ढोबळ नफा 4 कोटी 75 लाख रु. इतका झाला असून निव्वळ नफा 1 कोटी 91 लाख रु. इतका झाला आहे. पतसंस्थेच्या निव्वळ नफ्यामध्ये झालेली 15.48 टक्के वाढ ही पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचविणारी बाब आहे. संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला असता सभासदांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्‍वासाच्या जोरावर संस्थेने आपली घोडदौड सुरु ठेवली आहे, अशी माहिती चेअरमन गणपत वळंजू व सीईओ ईश्‍वरदास पावसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या आर्थिक वर्षा अखेर संस्थेचे भाग भांडवल 3 कोटी 13 लाख रु. झाले असून त्यामध्ये 30.56 टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे ठेवीत 122 कोटी 61 लाख रु. झाले असून त्यामध्ये 33.50 टक्के वाढ झाली आहे. कर्ज 99 कोटी 23 लाख रू. वाटप झाले असून त्यामध्ये 43.46 टक्के वाढ झाली आहे. निधी 9 कोटी 52 लाख रू. झाले असून त्यामध्ये 22.81 टक्के वाढ गुंतवणूक 37 कोटी 7 लाख रू. झाली असून त्यामध्ये 10.23 टक्के वाढ झाली आहे. संस्थेस आवश्यक तरतुदी केल्यानंतर सन 2023-24 सालात 1 कोटी 91 लाखांचा रू. निव्वळ नफा झालेला
आहे. संस्थेचे खेळते भांडवल 141 कोटी 60 लाखांचे रू. झाले असून उलाढाल 702 कोटींची झालेली आहे, असे वळंजू व पावसकर यांनी सांगितले.

डिजिटल युगात वैश्य समाज पतसंस्था देखील मागे नाही. संस्थेचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एक संस्थेच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. तंत्रज्ञानाची कास धरत संस्था कोअर बँकिंग सिस्टिममध्ये काम करत आहे. संस्थेने मोबाईल अ‍ॅप, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, नेट बँकिंग, क्युआर, एसएमस अर्लट, ईनॅच तसेच पासबुक प्रिंंटींग या सारख्या सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर पिग्मी
संकलन हे पिग्मी मशिन बरोबरच मोबाईल अ‍ॅपद्वारे सुरू केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कामकाजात करून तत्पर व पारदर्शक सेवा देण्याचा संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न आहे. संस्था आर्थिक व्यवहार करण्याबरोबरच सामाजिक भानही चांगल्या प्रकारे जपत आहे. वाढती स्पर्धा लक्षात घेता सभासदाभिमुख योजना संस्था सातत्याने राबवित आहे. सभासदांना आधुनिक दर्जेदार सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, आपला सभासद यापासून
कुठेही मागे राहता नये, याकरिता संस्था युद्ध पातळीवर काम करत असून संस्थेच्या या आर्थिक घोडदौडीत संस्थेचे सर्व संचालक, सभासद, ठेवीदार, ग्राहक, कर्मचारी, अल्पबचत प्रतिनिधी, असंख्य हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य व हातभार असल्याचे वळंजू व पावसकर यांनी सांगितले. आगामी काळात 200 कोटी ठेवींचे लक्ष लवकरात लवकर गाठण्याकरिता यापुढील काळातही संस्थेच्या विकासात सर्वांनी हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले.

संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =