प्राधिकरण निगडी – दिनांक ३० ऑक्टोबर रोजी प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या, चैतन्य दिवाळी अंक २०२६ चे प्रकाशन सोहळा दादा दादी उद्यानामध्ये सायंकाळी अतिशय दैदीप्यमान असा झाला.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन व दीप प्रज्वलन झाल्यानंतर सौ. अनुराधा पेंडुलकर यांनी स्वागत गीत सादर केले. संघाचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर जोशी तसेच संपादिका सौ आशा नष्टे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.दिवाळी अंक वेळेत छापून मिळावा यासाठी विशेष झटणाऱ्या संपादिका सौ.आशा नष्टे यांचा सत्कार श्री.चंद्रशेखर जोशी यांनी शाल,श्रीफळ देऊन केला.
दादा दादी विरंगुळा केंद्रासाठी पोडियम भेट दिलेले श्री.निनाद चिखलीकर यांचा सत्कार डॉ. श्री. गुणवंत चिखलीकर यांनी स्वीकारला.
प्राध्यापक,सुप्रसिद्ध साहित्यिक श्री.जगदीश संसारे यांचा परिचय सौ.साधना सपाटे यांनी करून दिला. त्यानंतर त्यांचा अध्यक्ष श्री. चंद्रशेखर जोशी यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. प्रमुख पाहुणे श्री. किरणराजजी चोप्रा , संचालक सत्यम ज्वेलर्स यांचा परिचय , श्री.विश्वास म्हशेटे यांनी अतिशय मार्मिक पद्धतीने करून दिल्यानंतर त्यांचा सत्कार श्री.दलिचंद शिंगवी (माजी अध्यक्ष) यांनी शाल श्रीफळ देऊन केला.
सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते अशा या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा होताना सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.प्रा. साहित्यिक श्री.जगदीश संसारे यांनी अवघ्या चार दिवसांमध्ये दिवाळी अंक अतिशय बारकाईने वाचून त्यातील लेख,कथा,कविता,प्रवास वर्णन वाचनीय आहेत असा उल्लेख केला , व अंक दर्जेदार झाला आहे असे म्हटले . त्यांनी आपल्या व्याख्यानाने सर्वांना खिळवून ठेवले. संपादक समितीतील सर्वांना त्यांनी विश्वभान प्रतिष्ठान तर्फे सुवर्णपदक प्रदान केले . प्रमुख पाहुणे किरणराजजी चोप्रा यांनी ज्येष्ठांचे आमच्या दुकानांमध्ये स्वागत व त्यांना खास सवलत असेल असा उल्लेख केला.या सोहळ्यात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय किर्तीचे पं. श्री.केशव गिंडे यांनी बासरी तसे श्री.सुभाष चव्हाण यांनी शंखवादन करून या कार्यक्रमाला चार चांद लावले.
दिवाळी अंकाकरिता सामाजिक,राजकीय,वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी विशेष आर्थिक योगदान दिल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. सौ.वृषाली गुर्जर,सौ.अस्मिता तारकुंडे,श्रीमती चांदबी सय्यद , सुनील दुर्गे तसेच कार्यकारिणी सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले . सौ स्मिता देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.कार्याध्यक्षा सौ.अलका बेल्हेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
