You are currently viewing आम.नितेश राणे यांनी खारेपाटण येथील पूरग्रस्त कुटुंबांची घेतली भेट, नुकसानीची केली पाहणी

आम.नितेश राणे यांनी खारेपाटण येथील पूरग्रस्त कुटुंबांची घेतली भेट, नुकसानीची केली पाहणी

खारेपाटण

खारेपाटण बाजारपेठेत पाणी घुसलेल्या कुटुंबांची भेट घेऊन आमदार नितेश राणे यांनी पुरस्थितीची पाहणी केली. पुरातन झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले. खारेपाटण बाजारपेठेत जाण्यासाठी पर्यायी मार्ग आणि सुखनदीचा गाळ उपसा करून बाजारपेठ सुरक्षित करण्याचे आश्वासन दिले. पुराचे पाणी ओसरले नसल्यामुळे बाजारपेठेत जाण्याचे सर्व मार्ग बंद होते म्हणून आम.नितेश राणे खारेपाटण हायस्कुल, कोष्टीआळी येथील डोंगर भागातून चालत चिखल तुडवत परत नुकसान झालेल्या कुटुंबापर्यंत पोहोचले.

आज सकाळी ९ वाजता पुरात अडकलेल्या लोकांच्या घरी जाऊन आम.नितेश राणे यांनी भेट घेतली व धीर दिला. आज पर्यंत अधिकारी पदाधिकारी यांनी पूर ओसरल्यावर येऊन सांत्वन केले आहे.  मात्र आमदार नितेश राणे यांनी पूर आलेला असतांनाच भेटी घेऊन जनतेला धीर दिला. गाळाने भरलेल्या सुख नदीमुळे आज पुन्हा खारेपाटण येथे पूर आला. गाळ उपसा केल्यास पूर येणार नाही त्यासाठी सुखनदीला जोडून असलेल्या वाघोटन खडीचा गळा उपसवा लागेल यासाठी आपण केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची मदत घेऊन हा गाळ उपसा केला जाईल असा विश्वास आम.नितेश राणे यांनी दिला.
कणकवली तालुक्यात पूरस्थिती निर्माण झालेल्या भागात भाजपा आमदार नितेश राणे यांनी भेट देऊन पाहणी केली.खारेपाटण येथे बाजारपेठेत आणि इतरत्र ठिकाणी घुसलेल्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. वाग्दे येथील पुराचीही पाहणी केली. सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून घेण्याचे आदेश यावेळी आम.राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले. शेतीच्या नुकसाणीचेही पंचनामे करा असे सांगितले.

खारेपाटण बाजारपेठ व परिसरात काल पासून पाणी भरले होते. त्यामुळे त्यामुळे घरात आणि दुकानात पाणी जाऊन नुकसान झाले. या सर्व नुकसानीची आमदार नितेश राणे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, सरपंच रमाकांत राऊत, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिप सदस्य बाळा जठार, प.स. सदस्य तुप्ती माळवदे, दिलीप तळेकर, सूर्यकांत भालेकर, महसूल अधिकारी यादव, सुधीर कुबल, तलाठी शेखर शिंदे, मंगेश गुरव, चेतन आलते, किरण कर्ले, बाबू मेहमान, आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा