*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कुंभमेळ्यात फेड तू नवस*
पाहुनी तुजला वेडी झाले
गोड हसतेस हात राखून
नजर रोखून तीर मारतेस
क्षणात जाते भान हरपून
//1//
चोरून पहाती दंत कळ्या
पहारा देती बटा काळ्या
जळतो आरसा समोरचा
साहून उन्हाच्या तप्त झळा
//2//
सीतामाई ही अशीच बसे
पहात वाट *हनुमंताची*
चिठी चपाटी श्रीरामाची
वेळ असे टपाल यायची
//3//
दिवसा मागून दिवस सरले
शालू शेले *कुठे उरले*
सीफाॅनच्या सुंदर साडीत
रूप तुझे *सुंदर दिसले*
//4//
वस्त्रोद्योगातील बडे बडे
उंबरा तुझा झिजवू लागले
चेहरा पाहून फोटो जेनिक
आपसूक त्यांचे पाऊल वळले
//5//
विसरून जा तू कवीला आता
सुगीचे आहेत तुझे दिवस
जमव भरपूर सुवर्ण मुद्रा
*कुंभमेळ्यात फेड तू नवस*
//6//
विनायक जोशी🖋️ ठाणे
2910/9324324157
