You are currently viewing बंध

बंध

*जागतिक साहित्य कला व्यक्तीत व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमरानी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*बंध…..!*
*****************************
तुटलेले बंध
डोळ्यातील आसू
शांत करु शकत नाहीत
मनातला दाह
👌👍🌷🌷
विखरलेले सागर
रात्रदिन यत्न करूनही
विखरलेली रेषा
मिटवू शकत नाहीत
👌👍💐💐
ऋणानुबंधाला तडे जातांना
तटतट तुटत राहतात
एक एक अनुबंध
न जुळण्यासाठीच
👌👍💐💐
चेहरे शोधत राहतात
आपलेपणाची ऊब
आसू लाव्हा होऊन
दगडीशीळा होतात
👌👍💐💐
सुकलेके रिते झरे
ओल धरत नाहीत
आठवाचे उमाळे
राख ओघळत राहतात
👌👍💐💐
शल्य शुल होऊन
टोकरत राहतो काळीज
आंधळ्या जनक्षोबास
दिसतो हिरवा गासचारा
👍💐
एक रेषा आपण
मिटवत राहतो आयुष्यभर
तरीही ती मिटत नाही
नुसती तडफड तडफड
🌷🌷
भडकलेली आगही
विझते पाण्याने
मनातली आग भिजवण्या
मी शोधत राहातो पाणी !!

मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =