You are currently viewing कवयित्री शैलजा करोडे यांना अनुभूती गौरव सन्मान
Oplus_16908288

कवयित्री शैलजा करोडे यांना अनुभूती गौरव सन्मान

 

इनोव्हेटिव मानबिंदू प्रकाशन व अनुभूती साहित्य  मंच आयोजित अनुभूती गौरव संमेलन आणि रंग तरंग साहित्साचे कार्यक्रमात कवयित्री शैलजा करोडे यांना साहित्य क्षेत्रासाठी  ” अनुभूती गौरव सन्मान ” मा सुधाकर सुरडकर (माजी पोलीस महासंचालक) मा.रामचंद्र नागरगोजे, (सत्राय्यक पोलीस आयुक्त मुंबई). मा.संभाजीराजे जाधवराव (मातृतीर्थ सिंदखेडराजा राजे लखोजी जाधवराव यांचे थेट 14 वे वंशज) संमेलनाध्यक्ष डाॅ. सुरेश भोपी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात कवयित्री शैलजा करोडे विशेष अतिथी होत्या.

रंग तरंग साहित्याचे या विविध काव्य प्रकाराच्या कार्यक्रमात आपल्या विविध चारोळ्या सादर करुन त्यांनी रसिकांची वाहवा मिळविली.

या यशाबद्दल शैलजा करोडे यांचे साहित्य, समाज ,मित्र परिवारकडून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा