You are currently viewing सावंतवाडीत ४ नोव्हेंबरपासून दिवाळी खरेदी महोत्सव

सावंतवाडीत ४ नोव्हेंबरपासून दिवाळी खरेदी महोत्सव

सावंतवाडीत ४ नोव्हेंबरपासून दिवाळी खरेदी महोत्सव

ओंकार मित्रमंडळातर्फे तीन दिवसीय प्रदर्शन; महिलांसाठी विविध कार्यक्रम, मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळ

सावंतवाडी

ओंकार मित्रमंडळ, भटवाडी यांच्या वतीने दिवाळीनिमित्त ४ ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळी निर्मिती विशेष प्रदर्शन व खरेदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉल येथे हा महोत्सव होणार आहे.
या प्रदर्शनात दिवाळीनिमित्त विविध वस्तू व उत्पादनांच्या खरेदीची संधी नागरिकांना मिळणार आहे. महिलांसाठी विविध कार्यक्रम, तर लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ग्राहकांसाठी लकी ड्रॉ आणि विशेष ऑफर्सही ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन ओंकार मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा