सावंतवाडीत ‘उमेश वसंत चोडणकर ज्वेलर्स’चा आज शुभारंभ
उभा बाजार येथे सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचे नवे दालन ग्राहकांच्या सेवेत
सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील उभा बाजार, बँक ऑफ इंडिया जवळ ‘उमेश वसंत चोडणकर ज्वेलर्स’ या नव्या दालनाचा भव्य शुभारंभ आज, शुक्रवार ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
या दालनात सोने, चांदी आणि हिऱ्यांचे विविध आकर्षक दागिने उपलब्ध असणार आहेत. शुद्धता आणि विश्वासाला प्राधान्य देत ग्राहकांना दागिन्यांच्या खरेदीचा नवा अनुभव देण्याचा या दालनाचा उद्देश आहे.
जी-२८६, उभा बाजार, बँक ऑफ इंडिया जवळ, सावंतवाडी येथे हे दालन सुरू होत आहे. या शुभारंभ सोहळ्याला उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन निमंत्रक प्रो. उमेश वसंत चोडणकर आणि कुणाल उमेश चोडणकर यांनी केले आहे.
