कणकवलीत ३१ ऑक्टोबरपासून रिक्षाचालक-मालकांची अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा
विजेत्या संघाला ११ हजार, तर उपविजेत्याला ७ हजारांचे पारितोषिक; दोन दिवस रंगणार क्रिकेटचा थरार
कणकवली
कणकवली रेल्वेस्थानक येथील ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे रिक्षाचालक-मालक मर्यादित खुल्या प्रकाशझोतातील अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक असलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला ११ हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला ७ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय अंतिम सामन्यातील सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकावीर आणि शिस्तबद्ध संघ अशा विविध वैयक्तिक व सांघिक पुरस्कारांनी खेळाडूंना गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ५०० रुपये असून, सर्व सामने चार षटकांचे खेळविण्यात येणार आहेत. इच्छुक संघांनी अधिक माहितीसाठी महेश कदम (९७६३१३३७३९), संतोष सावंत किंवा पिंटू चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
