You are currently viewing दीपक केसरकर यांना भाजपचा जोरदार धक्का..

दीपक केसरकर यांना भाजपचा जोरदार धक्का..

सिंधुदुर्ग :

आंबोली ग्रामपंचायत  निवडणुकीच्या तोंडावर असताना माजी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांना भारतीय जनता पक्षाने जोरदार धक्का दिला आहे. केसरकर यांचे खंदे समर्थक आणि आंबोली परिसरातील वजनदार नेते म्हणून परिचित असलेल्या दत्तू नार्वेकर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत अनेक समर्थकांसह नार्वेकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

आंबोली ग्रामपंचायत निवडणुकीच्या ऐन रनधुमाळीत दत्तू नार्वेकर यांनी भाजपमधे प्रवेश केल्यामुळे आंबोली परिसरात सेनेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जाऊ लागले आहे. दत्तू नार्वेकर यांच्यासोबत माजी सरपंच वैजयंती गावडे आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी गावडे यांच्यासह नार्वेकर यांच्या अनेक समर्थकांनी आज भाजपमधे प्रवेश केला आहे.

राज्यात 34 जिल्ह्यांमधील 14 हजार 234 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास 23 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. राज्यात 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. 2020-21 च्या निवडणुकीत दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे सरपंच-उपसरपंच पदाचे आरक्षण निकालानंतर जाहीर होणार आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी, भाजप, मनसे या सर्वच प्रमुख पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे गाव पातळीवरील निवडणुका रंगतदार होणार, यात शंका नाही.

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

एप्रिल, मे आणि जूनमध्ये महाराष्ट्रातील 1566 ग्रामपंचायतींची मुदत संपली होती. या काळात या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणे आवश्यक होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणे, निवडणुकीचे कामकाज, प्रचारसभा, मेळावे आदींचे आयोजन केले जाते. लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. यातून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × two =