You are currently viewing संवाद मीडियाच्या आरती संग्रहाचे छोट्या पडद्यावरील बाल कलाकार मृण्मयी सुपलच्या हस्ते प्रकाशन

संवाद मीडियाच्या आरती संग्रहाचे छोट्या पडद्यावरील बाल कलाकार मृण्मयी सुपलच्या हस्ते प्रकाशन

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशात आपल्या नवनव्या कल्पना, बातम्या, साहित्य आदींसह पोचलेल्या आणि अल्पावधीतच सर्वांच्या मुखी नाव कमावलेल्या संवाद मीडियाने गणेशोत्सवाचे औचित्य साधत श्री गणेशाच्या वेगवेगळ्या आरतींसह इतर सर्व प्रचलित आरती असलेला आरती संग्रह गणेशोत्सवाच्या पूर्व संध्येला प्रकाशित केला.

“असावा सुंदर स्वप्नांचा” व “तू माझा सांगाती” या मराठी सिरीयल मध्ये संत तुकारामांच्या आठ वर्षीय पत्नी अशा महत्वाच्या भूमिका केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्या पडद्यावरील बाल कलाकार कु.मृण्मयी सुपल च्या हस्ते संवाद मीडियाच्या आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाल कलाकार आरती सुपल हिने आरती संग्रहाचे प्रकाशन करताना संवाद मीडियाची खूप तारीफ केली आहे. संवाद मीडियावर दररोज प्रकाशित केले जाणारे लेख व कविता इत्यादी साहित्य अत्यंत सुंदर आणि दर्जेदार असल्याचे सांगताना आपल्यालाही वाचायला खूप आवडतात असे आवर्जून सांगितले.

गणेशोत्सवात सर्वांनी कोरोनापासून आपली काळजी घ्यावी असे सांगताना लहान मुलांनी फटाके फोडताना हाताला सॅनिटायझर लावू नये असेही बजावून सांगितले.

टिव्ही कलाकार मृण्मयी सुपल हिने सर्वांना गणेशोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत संवाद मीडियाने आरती संग्रह दिल्याने संवाद मीडियाचे देखील आभार मानत संवाद मिडियास सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत..

संवाद मीडियाने आरती संग्रह प्रकाशित करताना कोकणात पारंपरिक पद्धतीने प्रामुख्याने म्हटल्या जाणाऱ्या सर्व आरतींचा आरती संग्रहात समावेश केला आहे.

संवाद मीडियाचा आरती संग्रह घरोघरी पोचविण्याचा संवाद मीडिया प्रयत्न करीत आहे.

आरती संग्रहाच्या माध्यमातून संवाद मीडियाने आपल्या सर्व हितचिंतक, वाचकांना आणि जाहिरातदारांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देत आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 18 =