You are currently viewing माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत;

माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत;

माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत;

 जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा उपक्रम

 सिंधुदुर्ग

सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी कल्याणकारी निधी योजनेतून 1 लाख रुपयेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते हा धनादेश प्रदान करण्यात आला.

            आंबोली (ता. सावंतवाडी) येथील माजी सैनिक संतोष लक्ष्मण गावडे यांचे पाल्य आयुष्य हा शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये ‘फरगाना मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, उझबेकिस्तान’ (Fergana Medical Institute of Public Health, Uzbekistan) येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षात (MBBS-Ist) शिक्षण घेत आहे. त्याला परदेश शिक्षणाकरिता प्रोत्साहन म्हणून सैनिक कल्याण विभागाच्या वतीने ही आर्थिक मदत देण्यात आली आहे.

            जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लक्ष्मण कोळी आणि कार्यालयातील इतर कर्मचारीवृंद उपस्थित होते.

        जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या विविध योजनांतर्गत जिल्ह्यातील पात्र शहीदांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक आणि त्यांची अनाथ पाल्ये किंवा अवलंबितांना कल्याणकारी निधीतून शैक्षणिक व पुनर्वसनाच्या विविध प्रकारच्या आर्थिक मदती दिल्या जातात.

            जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थी, माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांनी अशा प्रकारच्या शैक्षणिक, स्वयंरोजगार व पुनर्वसनाच्या शासकीय कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. योजनांच्या अधिक माहितीसाठी आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02362–228820 वर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा