You are currently viewing हळवल मधील अपघाती वळणासंदर्भात तात्काळ उपायोजना न झाल्यास महामार्ग करणार बंद….

हळवल मधील अपघाती वळणासंदर्भात तात्काळ उपायोजना न झाल्यास महामार्ग करणार बंद….

हळवल मधील अपघाती वळणासंदर्भात तात्काळ उपायोजना न झाल्यास महामार्ग करणार बंद….

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचे तहसीलदार श्री देशपांडे यांना निवेदन सादर

कणकवली

तालुक्यातील हळवल फाट्यावर होणाऱ्या वारंवार होणाऱ्या अपघातामुळे अनेकांना जीव गमवावे लागले. येत्या पंधरा दिवसात याबाबत निर्णय घ्या. या ठिकाणी आवश्यक ते रबलर किंवा कमी उंचीचे स्पीड ब्रेकर बसवा अन्यथा पंधरा दिवसानंतर महामार्ग बंद करून तीव्र आंदोलन छेडले जाईल होणाऱ्या परिणामास तुम्ही जबाबदार राहाल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी हायवे उप अभियंता एम.आर. साळुंखे यांना दिला.

कणकवली तहसीलदार कार्यालयात तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या समक्ष झालेल्या चर्चे प्रसंगी ही. नाईक यांनी याबाबत इशारा दिला. यावेळी तहसीलदार श्री देशपांडे यांना दिलेल्या निवेदनात  म्हटले आहे, शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा जनतेला फायदाच होतो. नागरीकांचे जीवन सहज सुलभ होते. मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाट्यावरील वळण हे वाहनांचा व नागरीकांचा मृत्युचा सापळा बनला आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये अर्ध्या डझनापेक्षा अधिक जिवघेणे अपघात झाले. सन २०२१ च्या चतुर्थीच्या १ दिवस अगोदर सावंत नामक सर्वसामान्य घरातील वडाप वाहतुक करणाऱ्या व्यक्तिला आपला प्राण गमवावा लागला.

त्यामुळे त्यांचे कुटुंब निराधार झाले. हा अपघात ठेकेदाराच्या अपूर्ण कामामुळे व वाहतुक एकमार्गी असल्याने झाला होता. त्यानंतर झालेल्या जनप्रक्षोभक आंदोलनामुळे केवळ तात्पुरती मलमपट्टी करून वाहतूक दुहेरी करणेत आली. त्यानंतर काही काळात कन्टेनर पलटी झाल्याने किमान ६ ते ७ मोटरसायकलचा चुरहाडा झाला. यावेळी माणसांची वर्दळ असती तर कित्येक मृत्यु आपल्याला पहावे लागले असते. नजिकच्या काळात परत एकदा मोठी गाड़ी पलटी झाली. गेल्यावर्षी भल्यापहाटे लक्झरी बस पलटी झाल्यामुळे माणसांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान काही समाजसेवी मंडळींनी हळवल फाट्यावर आंदोलन केले, मात्र त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखविणेत आली. परिस्थिती आहे तशीच आंदोलनकर्त्या लोकांना सांगितलेल्या कुठल्याही गोष्टीची पुर्तता झाली नाही. या आठवड्यात १ कंटेनर पलटी होवून तो जागेवरून हटवल्यानंतर बरोबर तीन दिवसांनी पहाटे दूसरा टँकर पलटी झाला. या पलटी झालेल्या गाड्यांचे न भरून येणारे नुकसान होते. मात्र या ठिकाणी जर माणसांची वर्दळ असल्यास बऱ्याच नागरीकांना आपला जीव गमवावा लागला असता. याही पुढे ही अपघातांची मालिका अशीच चालू राहणार आहे. ही परिस्थिती थांबविण्यासाठी प्रशासन काय निर्णय घेणार की नाही हा संभ्रम जनसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

लोकांनी प्रक्षोभक व विघातक आंदोलने केली. सरकारी मालमत्तेचे नुकसान केले तरच या प्रश्नाला न्याय मिळणार आहे काय ? ही अपघात मालिका थांबविण्यासाठी आम्ही खालीलप्रमाणे उपाययोजना सुचवित आहोत १) गडनदिच्या सुरुवातीला उड्डाण पुल संपते पुलाला उतार असल्याने वाहनांची गती वाढते व कळते न कळते एवढ्यात धोकादायक वळण येते व वाहकाची ईच्छा असली तरी अपघात टळू शकत नाही. त्यासाठी- अ) राजापुरच्या उतारावर जसे गतिरोधक घातले आहेत तसे किंवा त्याच्यापेक्षा छोटे गतिरोधक दर १५/२० मिटरवर घातल्यास वाहनांची गती कमी होऊन अपघात टळू शकतात. (रम्बर ने वाहनांची गती कमी होणार नाही.बहुतेक वाहनांचे अपघात हे पहाटे ३/५ या वेळात होतात कारण अतिवेगाने आलेली वाहने जेव्हा वळणावर येतात तेव्हा तिथे पुर्ण काळोख असल्याने व तेथील रस्त्याच्या रुंदीची पूर्ण कल्पना येत नसल्याने अचानक ब्रेक मारणेचे प्रकार हावून वाहने पलटी होतात. वळण रुंद होण्यासाठी खास उपाययोजना व्हावी.

या ठिकाणी हायमॅक्सची व्यवस्था झाल्यास चालकांना येथील जागेची पूर्ण कल्पना आलेने अपघात कमी होण्यास मदत होईल. या किंवा अशा प्रकारच्या आपल्या कल्पनेत असलेल्या उपाययोजनांचा वापर करावा.वरील गोष्टींचा अम्मल १५ दिवसांच्या आत करुन अपघात मालिका थांबविण्याचा प्रयत्न न केल्यास या ठिकाणी म्हणजेच हळवल फाट्यावर आमच्या पक्षामार्फत व दशक्रोशितील ग्रामस्थांतर्फे लोकशाही मार्गाने उपोषणांतर्गत आंदोलन करण्यात येईल, याची दखल घेण्यात यावी. असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी दिलीप वर्णे, विलास गावकर यांच्यासह अमित केतकर व अन्य उपस्थित होते. यावेळी श्री साळुंखे यांनी या जागेचा सेफ्टी ऑडिट करण्यात आले आहे. त्या सूचनेनुसार येथे आठ दिवसात रमलर बसवण्यचे काम केले जाईल असे सांगितले. तसेच हाय मास्ट साठी अंदाजपत्रक करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर तहसीलदार श्री. देशपांडे यांनी अपघात होता नये या दृष्टीने तात्काळ उपाय योजना करा दिरंगाई होता नये याची काळजी घ्या अशा सूचना दिल्या.

*संवाद मीडिया*

Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️

*विवेक मार्केटींग*

*VIVEK MARKETING*

*▪️अल्गीप्रुफ – विश्वसनीय व दर्जेदार कन्स्ट्रक्शन केमिकल्स व वॉटरप्रुफींग मटेरिअल.*

*▪️युनायटेड रेडीमेड सेप्टीक टँक*

*▪️ बायोसेस अल्ट्रा सेप्टीक टँकसाठी बॅक्टेरिया कल्चर व क्लिनिंग एजंट्स*

*▪️ नर्सरी (रोपवाटीका) साठी सिल्पॉलीन ताडपत्री व शेडनेट्स*

*▪️सेवेज ट्रीटमेंट प्लॅट (BAP सिस्टीम)*🌱🪴

*प्रोप्रा. विवेक करंदीकर*

*♻️पितांबरी शॉपी (फ्रेन्चायझी)*♻️

*_🅿️पितांबरीची सर्व उत्पादने प्रॉडक्टस ग्राहकांना एकाच ठिकाणी आणि एकदम सवलतीचे दरात उपलब्ध._*

*📲9422632847*
*📲 7972662567*
*☎️02367-230481*

*📍२/४३७ सिंधुसागर कॉम्प्लेक्स, कस्टम ऑफीस समोर, तेलीआळी, कणकवली ४१६६०२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/115725/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा