You are currently viewing आगीत नुकसान झालेल्या संजीव निपाणीकरांना भाजपचा आर्थिक मदतीचा हात
Oplus_16908288

आगीत नुकसान झालेल्या संजीव निपाणीकरांना भाजपचा आर्थिक मदतीचा हात

विशाल परब आणि उपनगराध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकारातून मदत

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील संजीव निपाणीकर यांच्या चप्पल मार्टला लागलेल्या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या दुर्घटनेमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या निपाणीकर यांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला.

भाजपचे राज्यस्तरीय युवा नेते विशाल परब आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकारातून ही मदत करण्यात आली. भाजपच्या वतीने देण्यात आलेली रोख आर्थिक मदत नगरपरिषदेचे आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते संजीव निपाणीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी नगरसेवक अ‍ॅड. सिद्धार्थ भांबुरे, उपनगराध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते.

आगीसारख्या दुर्घटनेत छोट्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. अशा परिस्थितीत व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी आर्थिक मदतीबरोबरच मानसिक आधाराचीही गरज असते. ही बाब लक्षात घेऊन भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निपाणीकर यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

या मदतीमुळे निपाणीकर यांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी काही प्रमाणात आधार मिळणार असून, संकटाच्या काळात समाज त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा