You are currently viewing विज्ञान संबोध परीक्षेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे उत्तुंग यश!  

विज्ञान संबोध परीक्षेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे उत्तुंग यश!  

विज्ञान संबोध परीक्षेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे उत्तुंग यश!

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आयोजित विज्ञान संबोध परीक्षेत उत्तुंग यश संपादित केले.विज्ञान संबोध परीक्षेत इयत्ता सहावी ते नववी मधून एकूण 74 विद्यार्थी प्रविष्ट झाले. शालेय स्तरावर इयत्ता सहावी मधून मुस्तफिज बेग याने 86 गुण मिळवून प्रथम क्रमांक तसेच यश सावंत याने 81 गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर अहाद बेग याने 80 गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
इयत्ता सातवी मधून स्वरा धुरी व प्रेरणा कालांत्रे यांनी 94 गुण मिळवून प्रथम क्रमांक तर विहान शिर्के ,आरोही भाग्यवंत, प्रचिती गिरप व अझिमन करोल यांनी 93 गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर रिया जेवरे हिने 89 गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. इयत्ता आठवी मधून आराध्या गावडे हिने 68 गुण मिळवून प्रथम क्रमांक तर स्वरा राऊळ ,समर्थ गवंडळकर व अथर्व वेंगुर्लेकर यांनी 67 गुण मिळवून द्वितीय क्रमांक व नेरा रॉड्रिग्ज व किमया सावंत यांनी 66 गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. इयत्ता नववी मधून कनिष्का मकदम हिने 81 गुण मिळवत प्रथम क्रमांक तर अथर्वी मांजरेकर व करिष्मा मांजरेकर यांनी 69 गुण मिळवून द्वितीय क्रमांक तसेच मृण्मय शिरोडकर याने 68 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. इयत्ता सहावी मधून 14 , इयत्ता सातवी मधून 17 , इयत्ता आठवी मधून 13 व इयत्ता नववी मधून 17 विद्यार्थ्यांची विज्ञान गौरव परीक्षेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षिका श्रीम. साक्षी सावंत व श्रीम. फरजाना मुल्ला यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा