You are currently viewing कणकवली तालुक्यात दोन ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू…

कणकवली तालुक्यात दोन ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू…

कणकवली :

कणकवली तालुक्यात तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमधील दोन ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत असून गांधीनगर ग्रामपंचायत निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली असल्याने भिरवंडे तोंडवली बावशी या ग्रामपंचायतींसाठी ​सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात​ ​झाली. भिरवंडे ग्रामपंचायतच्या एकूण सात जागांसाठी ​११६१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत प्रभाग एकसाठी तीन पैकी दोन जागा बिनविरोध झाल्या असून एका स्त्री उमेदवार जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्वसाधारण स्त्री या एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. तर सर्वसाधारण एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ३ मध्ये दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. तोंडवली बावशीसाठी ​१२२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून तोंडवली ग्रामपंचायतसाठी एकूण सात जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात प्रभाग क्रमांक एकमधून दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये तीन जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक तीनमध्ये दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. तोंडवली बावशी ही ग्रामपंचायत यापूर्वी शिवसेनेच्या ताब्यात होती. मात्र यावेळी भाजपाकडून या ग्रामपंचायतला आपल्याकडे खेचण्यासाठी नियोजनबद्ध रणनीती आखण्यात आली आहे. भिरवंडे ही ग्रामपंचायत सतीश सावंत यांच्याकडे म्हणजे शिवसेनेकडे असली तरी येथील चार सदस्य बिनविरोध झाल्याने ग्रामपंचायतीची सत्ता आजमितीस शिवसेनेकडे आहे. मात्र यातील तीन जागांसाठी होणारी निवडणूक लक्षवेधी असणार आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत हे भाजपच्या बाजूने लक्ष ठेवून आहेत. तर शिवसेनेच्या बाजूने सतीश सावंत हे या निवडणुकी लक्ष ठेवून असल्याने शिवसेनेची सत्ता आली तरी तीन जागांबाबत उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. तालुक्यातील या दोन ग्रामपंचायती मध्ये तोंडवली बावशी ग्रामपंचायतची निवडणूक रंगतदार होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा