You are currently viewing वैश्य वाणी समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आमदार प्रमोद जठार यांचा मुंबईत सत्कार
Oplus_16908288

वैश्य वाणी समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आमदार प्रमोद जठार यांचा मुंबईत सत्कार

ओबीसी दाखल्यांच्या प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवून शासनदरबारी पाठपुरावा; नगरसेविका श्वेता पावसकर यांनी मानले आभार

मुंबई : वैश्य वाणी समाजाला ओबीसी दाखले मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विधिमंडळात आवाज उठविण्यासह संबंधित मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल आमदार प्रमोद जठार यांचा ‘वैश्य समाज, मुंबई’ संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.

या सत्कार सोहळ्यात कांजूरमार्ग, मुंबई येथील समाजभगिनी तथा नगरसेविका सौ. श्वेता राजेश पावसकर यांनी आपल्या भाषणातून आमदार प्रमोद जठार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “आमदार प्रमोद जठार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि शासनाकडून जीआर (GR) काढून घेतल्यामुळे माझे नगरसेवकपद शाबूत राहिले आणि मला न्याय मिळाला,” असे त्यांनी सांगितले.

वैश्य वाणी समाजाच्या प्रश्नांसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे एका लोकप्रतिनिधीला न्याय मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. हा क्षण आमदार प्रमोद जठार यांच्यासाठी भावुक आणि अभिमानास्पद ठरला. हा सत्कार केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून वैश्य वाणी समाजाच्या एकजुटीचा, संघर्षाचा आणि हक्कांच्या लढ्याचा गौरव असल्याचे त्यांनी नमूद केले.

वैश्य वाणी समाजाच्या हक्कांसाठी यापुढेही शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा विश्वास आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला ‘वैश्य समाज, मुंबई’चे सर्व पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा