You are currently viewing कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंसाठी संपर्क साधावा

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंसाठी संपर्क साधावा

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंसाठी संपर्क साधावा

सिंधुदुर्गनगरी

सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत असून योजनेअंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील दारिद्रयरेषेखालील भूमिहीन कुटुंबाना चार एकर जिरायती (कोरडवाहू) शेतजमिन किंवा दोन एकर बागाती (ओलीताखालील) शेतजमिन उपलब्ध करुन देण्यात येते. अशी  माहिती समाज कल्याण  सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे.

             लाभार्थी निवडीचे निकष: लाभार्थी हा अनुसुचित किंवा नवबौध्द घटकातील असावा. लाभार्थी दारिद्रयरेषेखालील भुमिहीन शेतमजुर असावा. लाभार्थीचे किमान वय 18 वर्षे कमाल वय 60 वर्षे असावे. जमिन ज्या गावात उपलब्ध आहे त्याच गावाचे रहीवाशी अर्ज करण्यास पात्र असतील. ज्या गावत जमिन उपलब्ध आहे त्या गावातील वरील अटी व शर्तीमध्ये बसणारे लाभार्थी असे लाभार्थी न मिळाल्यास लगतच्या गावातील लाभार्थी उपलब्ध न झाल्यास तालुक्यातील पात्र लाभार्थी यांचा विचार करण्यात येईल. महसुल विभागाने ज्यांना गायरान व सिलींगच्या जमिनीचे वाटप केलेले आहे त्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

             लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम, दारिद्रयरेषेखालील भूमिहीन अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील परीत्याक्त्या स्त्रीया. दारिद्रयरेषाखालील भूमिहीन अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विधवा स्त्रीया. अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत अनुसुचित जातीचे अत्याचारग्रस्त.

 अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे /दाखले

          लाभार्थी यांचा जातीचा दाखला. लाभार्थी यांचे दारिद्रयरेषेखालील दाखला सन 2007 किंवा त्या पुढील यादीतील. लाभार्थी भूमिहीन शेतमजुर असल्याबाबत  तहसिलदार यांचे प्रमाणपत्र. लाभार्थी यांचा शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचे प्रमाणपत्र. लाभार्थी यांचा रहीवाशी दाखला. लाभार्थी यांचा मागिल वर्षाचा उत्पन्नाचा दाखला. जमिन लाभार्थी यांना विक्री, हस्तांतरित लीज अथवा भाडेतत्वावर देता येणार नाही या बाबत हमीपत्र. कुटुबांतील कोणतीही व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसल्याबाबत प्रमाणपत्र. लाभार्थी यांचे कुटुंबातील कोणतीही व्यक्तींना यापूर्वी गायरान व सिलिंग खाली जमिन मिळाली आहे काय तलाठी यांचे प्रमाणपत्र.

वरिल योजनेअंतर्गत ज्या अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रयरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना शेतजमिन घेवू इच्छीतात त्यांनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय सिंधुदुर्ग सामाजिक न्याय भवन, सिधुदुर्गनगरी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. चिकणे कले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा