You are currently viewing रावणदहन

रावणदहन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*रावणदहन*

सावित्रीच्या लेकी शिकती भारी,
कमावत्या जाणत्या स्वतंत्र नारी,
जाती जिथे तिथे होती सर्वांवर भारी,
परि पुरषत्व येते आड घरीदारी.

ऊडण्याआधीच पंख छाटतो,
अवहेलनेने मनात मारतो,
स्वप्ने तिची धुळीस मिळवतो,
परंपरांच्या जोखडात बांधू पहातो.

फुलण्याआधीच कळीसाठी,
राक्षस होऊन कूस्करतो,
जिवंतपणी हाल करूनी मारून टाकतो,
नजरच त्याची विखारी गिळून टाकतो,
स्वातंत्र्यावर सतत गदा घालतो.

संशयी कर्ण पिशाच्च,
पुरषी ताकदीमूळे हैवान बनतो,
तिच्यासाठी डोळ्यात अंगार फुलवतो
असे अनेक रावण बाजारी बघतो.

अशा रावणांना आहे जाळायचे,
हातपाय आधी तोडायचे,
तोंडात शेण भरायचे,
चौरंगा करत तिथेच जाळायचे.

अनुराधा जोशी.
9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा