You are currently viewing गुलाssबी थंडी

गुलाssबी थंडी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित लावणी*

 

*गुलाssबी थंडी* 

 

माझ्या हाताने सदर्‍याची तुमच्या

काढू लागते गुंडी

अहो राया या ना

पडली गुलाssबी थंडी

अहो राया या ना

पडली गुलाssबी थंडी ।।धृ।।

 

वादळ गेलं पाऊस गेला

तुमच्या सयीनं गलका केला

इथेच थांबा म्हटलं राया

उलार नाहि ना बंडी ?।।१।।

अहो राया या ना

पडली गुलाssबी थंडी ।।

 

शरद गारवा फुले लगडली

आठवण तुमची मी अवघडली

तुम्हीच नाही गर्दी असु द्या

रीती वाटते मंडी ।।२।।

अहो राया या ना

पडली गुलाssबी थंडी ।।

 

नभी चांदणी उर दाटला

चंद्रही आहे आसुसलेला

प्रेम करुनी स्वतःस म्हणता

खुशाल मुमुक्षु दण्डि ।।३।।

अहो राया या ना

पडली गुलाssबी थंडी ।।

 

*सर्वस्पर्शी*

©वैद्यराज भूपाल देशमुख.

९८२३२१९५५०

प्रतिक्रिया व्यक्त करा