*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*उघडा डोळे बघा नीट*
भाऊ बहिणीचे ग्रुप वेगळे
दांडिया चालतो रात्रभर
*उघडा डोळे बघा नीट*
माणुसकी आहेना जागेवर
//1//
ओळखून आपली जबाबदारी
उत्साहाला घाला *आवर*
देव देवतांचे *नावावरती*
गरब्यात शिरतो कधी डुक्कर
//2//
करून पळती नसते उद्योग
माध्यमाद्वारे देतात धमकी
सण संधीचा घेऊनी आधार
पळवून नेतात *माणुसकी*
//3//
नाही ज्यांना कोणी भाऊ
हवे सांभाळून थिरकायला
कसे करणार *देवी रक्षण*
नको थारा बहुरूपी भावाला
//4//
मंडपा बाहेर राहून *जागृत*
निरीक्षण करा आपले आपण
*हरवली नाही माणुसकी*
नका वापरू उगाच गोफण
//5//
टाळी न वाजते *एक हाताने*
मिळतो प्रतिसाद दुसऱ्याकडून
*नाचत नाही कृष्ण कुठे*
गोपी आणतात त्याला धरून
//6//
विनायक जोशी 🖋️ठाणे
1910/9324324157
