You are currently viewing शेर्ले दुकानवाडीत आगीचे तांडव; भुसारी दुकान जळून खाक

शेर्ले दुकानवाडीत आगीचे तांडव; भुसारी दुकान जळून खाक

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

बांदा : शेर्ले दुकानवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत भुसारी दुकान जळून खाक झाले. या दुर्घटनेत दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही.

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी नगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न करण्यात आले. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या आगीमुळे दुकानातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, नुकसानीचा सविस्तर तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. घटनेची माहिती मिळताच उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिससह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा