*अध्यक्ष, कोमसाप सावंतवाडी तथा जागतिक साकव्य विकास मंच सदस्य, श्रीशब्द लालित्य समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित भावस्पर्शी काव्यरचना*
*नाना..: एक वादळ, वंदनीय..!*
कळत नकळत अचानक
न बोलताच गेलास नाना
सांगायलाही नको नंतर
साखर झोपेचाच बहाणा
वय पंच्याहत्तर झाले जरी
उत्साह होता लाटांसमान
उसळत त्वेषाने देतसे तो
कलेत गुणवत्तेचेच प्रमाण
ज्येष्ठ श्रेष्ठ कुणी असो समोर
तुझा अभिनय भाव खायचा
स्टेजवर, सेटवर तुझा वावर
खरंच जिवंतपणा आणायचा
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना
सदैव दिला तू मदतीचा हात
दत्तक घेत गावे केला विकास
हे न इथल्या सर्वजनांस ज्ञात
जे ना पटले कधी तुला तू
फटकळपणे बोलून गेलास
व्यवस्थेला व्यवस्थितपणाचा
नेमका घालून धडा दिलास
का रचावी आता तुझी चिता
अन् त्यात लाकडे चंदनाची
चंदनापरी झिजवलास देह
गावी गाणी केवळ वंदनाची
ओली असता वात विझला
पणती मधला दिवा तेजस्वी
वंदन करतो झुकवुनी मान
नाना तुझ्या कार्यास मनस्वी
🖊️दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी, सिंधुदुर्ग
८४४६७४३१९६
