You are currently viewing मुणगे गावचे माजी सरपंच सुरेश बोरकर यांचा श्री भगवती देवस्थान कमिटीतर्फे सत्कार!

मुणगे गावचे माजी सरपंच सुरेश बोरकर यांचा श्री भगवती देवस्थान कमिटीतर्फे सत्कार!

मसुरे / प्रतिनिधी :

देवगड तालुक्यातील मुणगे येथील ग्रामदैवत श्री भगवती देवस्थान कमिटीच्या वतीने गावातील विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांत मोलाचे योगदान देणारे माजी सरपंच तथा ज्येष्ठ भजनीबुवा सुरेश बोरकर यांचा श्री भगवती देवालयात विशेष सत्कार करण्यात आला.

सुरेश बोरकर यांचे मुणगे गावातील सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमात नेहमीच मोलाचे सहकार्य लाभत आले आहे. याशिवाय श्री भगवती देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाच्या कालावधीत राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सूचना आणि मार्गदर्शन आपल्या ओघवत्या निवेदनातून देण्याचे महत्त्वपूर्ण काम ते सातत्याने करत असतात.

आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी शासनाच्या विविध विकास योजना गावात प्रभावीपणे राबवून गावाच्या विकासाला गती दिली होती. तसेच गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी अनेक तंटे आपापसात सोडवून गावात शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण करण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

सुरेश बोरकर हे स्वतः भजनीबुवा असल्याने त्यांनी अनेक नवोदित भजनी कलाकारांना घडवले व मार्गदर्शन केले आहे. गावातील विविध भजन मंडळे सतत कार्यरत राहावीत आणि लोककला जपली जावी, यासाठीही त्यांचे नेहमीच प्रोत्साहन लाभले आहे. याच पार्श्वभूमीवर, सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान आयोजित तिरंगी भजन सामन्याच्या प्रसंगी उपस्थितांच्या साक्षीने भजनी बुवा सुरेश बोरकर यांचा देवस्थान कमिटीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

या भव्य सोहळ्याला श्री भगवती देवस्थानचे अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर, विश्वस्त प्रकाश सावंत, पुरुषोत्तम तेली, अनिल धुवाळी, रामचंद्र मुणगेकर, कृष्णा सावंत, आनंद घाडी, रामतीर्थ कारेकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भगवती हायस्कूलचे शिक्षक प्रसाद बागवे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा