*सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राला दिशा देणारा जिल्हा*
*महाराष्ट्र भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांचे प्रतिपादन*
*भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग किसान मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न*
सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राला दिशा देणारा जिल्हा असून, शेतकरी हा देशाचा कणा आहे. किसान मोर्चाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळत आहे, हे त्यांचे भाग्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रामकृष्ण वेताळ यांनी केले.
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज प्रदेशाध्यक्ष श्री. रामकृष्ण वेताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली. यावेळी ते मार्गदर्शन करत होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन वेळा कर्जमाफी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेंतर्गत सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली. किसान मोर्चाच्या मागणीला प्रतिसाद देत जुन्या शेतीपंपांची थकीत वीजबिले माफ करण्यात आली असून, साडेसात एच.पी.पर्यंतच्या कृषीपंपांना वीजबिलमुक्त करण्यात आले आहे. तसेच महिला शेतकरी प्रमाणित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, ‘ट्रिगर-1’मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश केल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे त्यांनी विशेष आभार मानले.
महाराष्ट्रातील पहिली जिल्हा कार्यकारिणी बैठक सिंधुदुर्गमध्ये आयोजित करण्यात आल्याबद्दल जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांचे त्यांनी कौतुक केले. ग्रामपंचायतीपासून केंद्र सरकारपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असून, किसान मोर्चाने पक्षाच्या प्रत्येक बूथपर्यंत पोहोचून शेतकऱ्यांशी संपर्क वाढवावा, असा संदेश त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
*शासनाच्या १२ सवलती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा — प्रभाकर सावंत*
भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आल्याने शासनाने जाहीर केलेल्या १२ प्रकारच्या सवलती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील विविध शासकीय योजना जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयातून सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी गावागावात काम सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. किसान मोर्चाच्या वतीने आवळेगाव येथे वनराई बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण प्रदेशाध्यक्ष वेताळ साहेबांच्या हस्ते करण्यात आले .
या कार्यक्रमाला प्रदेश सदस्य मोहन सावंत, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष उमेश सावंत, संघटक तथा जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रसन्न देसाई, किसान मोर्चा माजी अध्यक्ष अमृत चौगुले, गोसेवा आयोगाचे सदस्य दिपक भगत, सरचिटणीस महेश संसारे, ज्योती देसाई, प्रसाद भोजने श्यामसुंदर राय, उपाध्यक्ष गुरुनाथ पाटील, अजय सावंत, दामोदर नारकर, कीर्तमंगल भगत इत्यादीसह सर्व जिल्हा पदाधिकारी मंडल अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते
जिल्हा कार्यकारिणी नवनियुक्त पदाधिकारी आणि मंडल अध्यक्ष यांची नियुक्ती पत्र सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली
बैठकीला मान. मोहन सावंत,यशवंत पंडित,प्रसन्ना देसाई, दिपक भगत , उमेश सावंत यांनीही मार्गदर्शन केले
सभेचे सूत्रसंचालन सरचिटणीस महेश संसारे यांनी तर आभार शंकर तेजम यांनी मानले राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली .
