समता क्रांती मार्च च्या नियोजनासाठी आर.पी.आय.(आठवले)पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी यांची 27 मार्च ला सावंतवाडीत बैठक
सावंतवाडी
भारतीय संविधानाचे शिल्पकार,विश्वभुषण,महामानव-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या क्रांतीकारी महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमीत्त व क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या द्वीजन्मशताब्दी वर्षानिमीत्त रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री -मा.नाम.डॉ.रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर “समता क्रांती मार्च” चे आयोजन केलेले आहे.
दरम्यान 14 नोव्हेंबर 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाम.डॉ.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली *समता क्रांती मार्च* चे आगमन होणार आहे,समता क्रांती मार्च चे भव्य स्वागत व सभेच्या नियोजनासाठी येत्या रविवार दि.27 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता सावंतवाडी येथील मॅंगो हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात येत आहे.
सदर बैठक पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव-मा.रमाकांत जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष-मा.अजितकुमार कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.सदर बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस-प्रकाश कांबळे यांनी केले.
