You are currently viewing सामाजिक कार्यकर्ते मुकुंद काळभोर यांचे दु:खद‌ निधन

सामाजिक कार्यकर्ते मुकुंद काळभोर यांचे दु:खद‌ निधन

*सामाजिक कार्यकर्ते मुकुंद काळभोर यांचे दु:खद‌ निधन*

पिंपरी

काळभोरनगर, चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच दिशा सोशल फाउंडेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद वसंत काळभोर (वय ५२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुरेखा काळभोर, मुलगी ॲड. शिवांजली काळभोर, चार चुलते दत्तात्रेय काळभोर (माजी प्रशासन अधिकारी, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका), अशोक काळभोर (संचालक, गजानन लोकसेवा सहकारी बँक), संभाजी काळभोर (राष्ट्रीय खेळाडू), तानाजी काळभोर (सामाजिक कार्यकर्ते), मेव्हणे भाऊसाहेब भोईर (माजी नगरसेवक, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका) आणि राजाभाऊ गोलांडे (माजी नगरसेवक, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका) असा परिवार आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा