You are currently viewing गणेशाचे गुण विशेष

गणेशाचे गुण विशेष

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

  *”गणेशाचे गुण विशेष”*

 

गणेशाचे गुण आदर्शांचे करू स्मरण

देई शिकवण मनुष्यास वरदानII धृII

 

माता-पित्यांचे राखे सर्वथा सन्मान

कार्तिकेय बंधू शोभे शिव गौरी नंदन

देव ऋषींना प्रिय सदा राखे सन्मानII1II

 

व्यासांनी सांगितले गणेशा लिहावे सअर्थ

महाभारताचे व्यासांनी सुरू केले कथन

लेखणी तुटली लिहिताना जलदतेनंII2II

 

गणेशांनी तोडला दात टिकावण्या वचन

गणेशांनी सुरू ठेविले लिखाण अखंड

वचनपूर्तीसाठी झाला एकदंत II 3II

 

श्रवण शक्तीची महती गणेशाचे मोठे कान

बाप्पाचे नेत्र लहान पाही सूक्ष्म दृष्टीनं

सर्वांचे अपराध क्षमा करी घेई उदरातII4II

 

©️काव्य:श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा