*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पाऊस*
सुगंधी वार्यासंगे आला मृदंगंघ वहात
मी होते पावसांच्या सरीत हर्षे
नहात
मनी मोहरते विविधरंगी स्वप्नांची
बरसात
धुंदीतल्या कळ्यांना वाटेउगवावी
प्रभात
पावसांच्या सरीत दिसे प्रिया तुझे
प्रतिबिंब
मन भरुनिपाही नयनी साठविलेले
रूप चिंब
येती सुखद स्मृतीच्या वळीवसरी
अंतरंगी
बहरलेल्या क्षणांच्या सुखद धुंद
प्रीतरंगी
पावसाळे कितीक तवआठवात
वाहून गेले
हृदय भरून येते जसे नभी जलद
भरू आले
शोधु कुठे तुला मी,सारेचस्मृतीगंध
वाहून गेले
तरी प्रत्येक क्षणी, ते मंतरलेलेक्षण
जपून ठेवले
रिमझिम सरीत, धरूपाहिले,हृदयी
अजून मंतरलेले
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
मुंबई ।।।। विरार