You are currently viewing हे गणराया..

हे गणराया..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…. लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी श्री.दीपक पटेकर लिखित अप्रतिम गीत रचना*

*वृत्त भूपति*

*हे गणराया…*

हे गणराया मी शरणी तुझिया आलो
दर्शने तुझ्या अजि धन्य धन्य मी झालो !धृ!!

नेसले पितांबर पिवळे हिरवा शेला
कंठात शोभती मोतीयांच्या माला
रुप नयन मनोहर नेत्रांनी या प्यालो
दर्शने तुझ्या अजि धन्य धन्य मी झालो !!१!!

शोभतो शिरावर मुकुट सोनेरी सुंदर
पार्वती पुत्र तू श्री शंकर सुत शिवहर
चौरंगी बसता ध्यानात रंगुनि गेलो
दर्शने तुझ्या अजि धन्य धन्य मी झालो !२!!

दुर्वा नि शमी फुल जास्वंदीचे वाही
प्रिय लाडू मोदक मूषक संगत राही
भक्तीत दंग मी रंगात तुझ्या न्हालो
दर्शने तुझ्या अजि धन्य धन्य मी झालो !!३!!

हे गणराया मी….
….शरणी तुझिया आलो…

©【दिपी】✍️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा